आपत्तीव्यवस्थापन जनजागृती / प्रशिक्षण कार्यशाळा

Home > Events > Categories > Event > आपत्तीव्यवस्थापन जनजागृती / प्रशिक्षण कार्यशाळा

Navjeevan Education Society’s

Navjeevan Law College

Shivshakti Chowk, 4th Scheme, CIDCO, Nashik-422008

Ph.No.- 0253-2372157/2379751

E-Mail ID-nav.lawcollege@gmail.com

Website: navjeevanlawcollege.com 

आपत्तीव्यवस्थापन जनजागृती / प्रशिक्षण कार्यशाळा

दिनांक 3 ऑगस्ट 2023

 

महसूल सप्ताह अंतर्गत आज दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता नवजीवन एज्युकेशन सोसायटी संचलित नवजीवन विधीमहाविद्यालय  या ठिकाणी नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी महोदय  मा. श्री जलज शर्मा सर यांचे सूचने नुसार व मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीयांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापना विषयी जनजागृती / प्रशिक्षण कार्यशाळा ( क्षमता बांधणी करिता ) आयोजित करण्यात आली होती.

 

सदर कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापना तर्फे आपत्ती व आपत्तीचे प्रकार, आपत्ती व्यवस्थापनाच्या पायऱ्या, इत्यादी बाबत माहिती देण्यात आली. तसेच प्रात्यक्षिके देखील करून दाखवण्यात आली. त्यामध्ये आगवआगीचे प्रकार त्याबद्दल माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. श्रीकृष्ण देशपांडे सर यांच्या द्वारे देण्यात आली व त्याची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले.

 

तद्नंतरआपत्तीमध्येअडकलेल्याव्यक्तीच्याबचावासाठीव्हर्टिकलरेस्क्यूवबाधितव्यक्तीसझीपलाईनप्रकाराद्वाराजखमींचीसंख्याजास्तअसताना / मोठ्याप्रमाणातहानीझालेलीअसतानासुखरूपपणेविमोचनकरणेयाचेप्रात्यक्षिककरूनदाखविले.  महाविद्यालयाचेविद्यार्थ्यां, शिक्षकवशिक्षकेतरकर्मचारीयांनीदेखीलभागघेतला

 

आजच्या प्रशिक्षण कार्यक्रमात महाविद्यालयाच्या वतीने नवजीवन एज्युकेशन सो. चे सेक्रेटरी श्री विजय काळे, सी. इ. ओ.  श्री सोमनाथ चौधरी, मॅनेजमेंट प्रतिनिधी श्रीमती. मंगल पवार,  श्री अनिल देशमुख व नवजीवन विधि महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ शाहिस्ता इनामदार, प्रोफेसर मकरंद पांडे, डॉ. प्रज्ञा सावरकर, डॉ.समिर चव्हाण, डॉ. शालिनी घुमरे, श्रीमती उल्का चव्हाण,  प्रो. वसुंधरा चौधरी व इतर शिक्षकशिक्षकेतर कर्मचारी श्री अतुल उंबरकर, श्री हर्षल आणेराव व श्रीमती अल्का लोखंडे उपस्थित होते.

 

प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षण देण्यासाठी भोसला एडवेंचर फाउंडेशन, नाशिक टीम  (चैतन्य जोशी, वंदना कुलकर्णी, विक्रम बेंडकुळे, रवी पिंगळे, सागर पळेकर, रोहित हिवाळे, अथर्व लोहगावकर, वआपदामित्र (मनोज कनोजिया, तुषार पाटील, शिव महरक, हर्षदा महाले, प्रतीक्षा आंधळे, बबीता सहानी),  मास्टर ट्रेनर जीशान शेखयांचे सहकार्य लाभले.

 

*प्रशिक्षणा दरम्यान शिकवण्यात आलेले विषय:-* आपत्ती व आपत्ती चे प्रकार, आपत्ती व्यवस्थापना च्या पायऱ्या तसेच हायराईज रेस्क्यू प्रात्यक्षिक, रॅपलिंग, झिपलाईन आग, आगी चे प्रकार व अग्निशमन यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.