छत्रपती शिवाजी महाराज जयंती

Home > Events > Categories > Event > छत्रपती शिवाजी महाराज जयंती

Date :- 19/02/2023

नवजीवन विधी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजयांची जयंती साजरी करण्यात आली. जयंती निमित्त  कार्यक्रमास प्राचार्या, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्या डॉ.शाहिस्ता इनामदार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व प्रतिमापूजन केले. इतर सर्वकर्मचारी सदस्य प्रा. उल्का चौहान, प्रा. वसुंधरा चौधरी, ग्रंथपाल सौ. मंगल पाटील,  अॅड. मीनाक्षी जाधव, प्रा. रोहित मुळे, अॅड. वैष्णवी कोकणे – बस्ते, अलका लोखंडे, आदीमान्यवरांनी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. अस्मिता सांगळेनी (BALLB – I) कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, त्यानंतर इतर विद्यार्थी गौरव गIजरे (LLB–I), माऊली महाराज सदगीर  (BALLB – I) आणि फॅकल्टी मेंबर प्रा. रोहित मुळे,  यांनी आपले विचार मांडले. प्रेरणा पराते आणि संकेत चव्हाण या विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण प्राचार्या डॉ. शाहिस्ता इनामदार यांनी केले.

शेवटी, भक्ती काळे (BALLB – II) यांनी कार्यक्रमाचे आभार मानले आणि त्यानंतर समन्वयक प्रा. उल्काके. चौहान यांनी कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमा निमित्त विद्यार्थी पारंपारिक वेशभूषेत आले होते. नवजीवन विधी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करतांना प्राचार्या, सर्वशिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांचा त्रिवार मानाचा मुजरा.