नवजीवन विधी महाविद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा

Home > Events > Categories > Event > नवजीवन विधी महाविद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा

जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाचं कामकाज भारतीय संविधानाच्या आधारावर सुरळीत पणे चालू असून , भारतीय संविधानाविषयी जाणून घेणे हे प्रत्येक भारतीय नागरीकाचे कर्तव्य आहे. नवजीवन विधी महाविद्यालायत दरवर्षी प्रमाणे संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून न.ब.ठाकूर विधी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एच. ए. काद्री उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवजीवन विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल चव्हाटे उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. चव्हाटे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले तसेच भारतीय संविधानाचे महत्व याविषयी आपले विचार मांडले. प्रा. डॉ. समीर चव्हाण यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे
वाचन केले.
भारतीय लोकशाही समोरील अनेक आव्हानांना संविधानिक मार्गाने उत्तर देता येईल आणि यामध्ये युवकांची भूमिका महत्वाची असणार आहे. विधी शाखेचे शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी संविधानिक मूल्य जाणून घेत याविषयी जनजागृतीचे काम करावे अशी अपेक्षा यावेळी डॉ. काद्री यांनी व्यक्त केली. भारतीय संविधान हे भारतीय प्रजासत्ताकाचे सर्वोच्च न्यायालय आहे. त्याला न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार आहे असे प्रतिपादन डॉ. काद्री यांनी केले.
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रा. वसुधा चंदनशिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. मकरंद पांडे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री.अनिल देशमुख , श्री. महेंद्र विंचूरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.