“मराठी भाषा गौरव दिन”

Home > Events > Categories > Event > “मराठी भाषा गौरव दिन”

दिनांक:- २७ फेब्रुवारी 2023


“मराठी भाषा गौरव दिन” हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेण्यात आला. “मराठी भाषा गौरव दिन” नवजीवन विधी महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्र. प्राचार्य डॉ. समीर चव्हाण, प्रा.मकरंद पांडे, डॉ प्रज्ञा सावरकर, डॉ.शालिनी घुमरे, प्रा उल्का के. चौहान प्रा वसुंधरा चौधरी, अॅड. वैष्णवी कोकणे- बस्ते, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव गाजरे (LL.B. I) या विद्यार्थ्याने केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अॅड. समीर शिंदे हे होते, त्यांनी न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा उपयोग या विषयावर विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सखोल व मोलाचे मार्गदर्शन केले. ग्रंथपाल सौ.मंगल पाटील यांनी त्यांना बालपणी कुसुमाग्रज यांच्या हस्ते मिळालेल्या पहिल्या बक्षिसाबद्दलच्या आठवणी सांगितल्या. तसेच अॅड कोंकणे – बस्ते यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर इतर विद्यार्थी प्रतिक्षा शिंदे(B.A.LL.B – I)), पुजा चिंधे (B.A.LL.B – I), गुलाब करटुले(LL.B I) यांनी
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपले विचार मांडले. आणि कवी कुसुमाग्रज यांच्या जीवनाबद्दल, मिळालेल्या पुरस्काराबद्दल तसेच मराठी भाषेला विषेश दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल माहित दिली. तसेच भक्ती काळे (B.A.LL.B – I) या विद्यार्थीनीने वि. वा. शिरवाडकर यांची प्रसिद्ध कविता “कणा सादर केली. गौरव गाजरे (LL.B – I) या विद्यार्थाने छत्रपती शिवाजीमहाराजांच्या काळापासूनचे मराठी भाषेचे कसे संवर्धन केले गेले याबद्दल माहिती सांगीतली. अध्यक्षीय भाषण प्र. प्राचार्य डॉ. समीर चव्हाण यांनी केले. गौरव गाजरे (LL.B. I) या विद्यार्थ्याने आभार मानले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. अनिल देशमुख, श्री. महेंद्र विंचूरकर, सौ. अल्का सोनवणे, श्री. अतुल उंबरकर, श्री. हर्षल आणेराव, श्री. विश्वास शेळके, श्री. गजानन लोहे, श्री. पवार, सौ. ज्योती ताजणे यांचे सहकार्य लाभले.