*एड्स जनजागृती कार्यक्रम*

Home > Events > Categories > Event > *एड्स जनजागृती कार्यक्रम*

*एड्स जनजागृती कार्यक्रम*

 

दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी नवजीवन लॉ कॉलेज, नाशिक येथे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिक यांच्या वतीने एड्स जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल चव्हाटे, प्राध्यापकवृंद तसेच अंदाजे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची माहिती श्रीमती चौधरी मॅडम, (जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग) यांनी विद्यार्थ्यांना दिली. त्यांनी एड्स म्हणजे काय, त्याचा प्रसार कसा होतो, प्रतिबंधात्मक उपाय, तसेच समाजातील गैरसमज याबाबत सविस्तर व सोप्या शब्दांत मार्गदर्शन केले.

प्राचार्य डॉ. प्रफुल्ल चव्हाटे तसेच प्रा. श्री. मकरंद पांडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यांनी एड्सबाबत जनजागृतीचे महत्त्व, युवकांची भूमिका आणि आरोग्याबाबत जबाबदार वर्तन ठेवण्याची गरज यावर मौलिक विचार मांडले.