*क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती* (बालिका दिन)

Home > Events > Categories > Event > *क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती* (बालिका दिन)

*क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती* (बालिका दिन)

 

दि. ३ जानेवारी २०२६ रोजी नवजीवन लॉ कॉलेज, नाशिक येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक व स्त्रीमुक्ती क्षेत्रातील अमूल्य कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देणे हा होता.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमात डॉ. प्रज्ञा सावरकर( Associate Professor) यांनी प्रमुख मार्गदर्शनपर भाषण केले. आपल्या भाषणातून त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या महिलांच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्याचा, त्यांच्या संघर्षाचा आणि सामाजिक समतेसाठी दिलेल्या योगदानाचा सखोल आढावा घेतला.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग व कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.