*वीर बाल दिवस*
नवजीवन विधी महाविदयालयात दि. २६/१२/२०२५ रोजी श्री. गोबिंदसिंहजी यांच्या प्रकाशवर्षाच्या निमित्ताने ‘वीर बाल दिवस’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाकरीता मोठ्या संख्येने विदयार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल चव्हाटे यांनी शीख धर्माचे दहावे गुरु श्री. गोबिंदसिंहजी यांचे चार सुपुत्र साहिबजादे बाबा अजितसिंह, बाबा जुझारसिंह, बाबा जोरावरसिंह व बाबा फतेहसिंह यांनी धर्म स्वातंत्र सत्य व न्यायाच्या रक्षणासाठी औलोकिक शौर्याने बलिदान दिले; ही घटना भारतीय इतिहासातील अव्दितीय शौर्याचे कसे प्रतिक आहे यावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित विदयार्थ्यानमध्ये युवकांमध्ये राष्ट्रनिष्ठा व नैतिक मूल्यांचा प्रसार या विषयावर गट चर्चा आयोजित करण्यात आली.

