तारीख – २६/०६/२०२५
नवजीवन विधी महाविद्यालयामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल चव्हाटे यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी प्रा. डॉ. समीर चव्हाण यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्य आणि कर्तृत्वाची ओळख करून देतांना त्यांच्या अनेक ऐतिहासिक निर्णय आणि आयुष्यातील प्रसंग यांना उजाळा दिला. महाराजांनी अनिष्ठ सामाजिक रूढी व प्रथा यांच्यावर बंधने आणून समाजाला पुढे नेण्यासाठी समाजोपयोगी व लोकहिताचे कायदे केले त्यामुळेच राजर्षी शाहू महाराज यांना लोकराजा असे म्हटले जाते. त्यामुळेच त्यांची जयंती समता दिन म्हणून साजरी केली जाते.त्यांनी आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. त्याचबरोबर मागासवर्गीयांना संस्थानातील नोकऱ्यांमध्ये 50 टक्के आरक्षणाची तरतूद केली. शाहू महाराज यांचे विचार व कार्य हे काळाच्या पुढे जाणारे आहेत असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.