NSS Special winter Camp 2023

Home > Events > Categories > Event > NSS Special winter Camp 2023

Day 1- Inaugural FunctionDate 02/02/2023

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व नवजीवन एज्युकेशन सोसायटीचे नवजीवन विधीमहाविद्यालय, नाशिक यांच्या संयुक्तविद्यमाने ‘युवकांचा ध्यास, ग्रामशहर विकास या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराचं उद्घाटन समारंभ ग्रामपंचायत, ग्रामसंस्कार केंद्र विचुरीगवळीता. जि. नाशिक येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

पुस्तकी शिक्षणाच्या आणि संकल्पनांच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं जीवन जगत असताना येणाऱ्या अडचणींचा सामना कसेकरावे याचे शिक्षण विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांना घेतायावं या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यातआले होते. या प्रसंगी विचार मंचावर ग्रामपंचायत समितीचे सर्व सदस्यगण, नवजीवन एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्तमा .बडे सर मा. सोमनाथ चौधरी (सी. ई. ओ.-नवजीवन एज्युकेशन सोसायटी ) तथा इतर ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी मा.बडे सरांनी म. गांधींच्या स्वप्नातील भारत या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, भारत हा खेड्यांचा समूह असलेला देश आहे. उद्याचा समृध्द भारत निर्माण करायचा असेल तर खेडी स्वयंपूर्ण आणि विकसित होणे गरजेचे आहे. यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. बदल हा निसर्गाचा नियमअसला तरी ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण ते स्वीकारू. युवकांनी विचार केला तर एकादिवसात ही स्वतःच जीवन बदलू शकतात. येणाऱ्या सात दिवसांत विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणावायासाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्यात. या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थांनी पुढील सात दिवस सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

उद्घाटन समारंभा नंतर लगेचच गावातील मुख्य मार्गावरून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांकडून विविध जनजागृती करणाऱ्या घोषणा करण्यात आल्या.

याप्रसंगी नवजीवन विधीमहाविद्यालय, नाशिक च्या प्र. प्राचार्या डॉ. शाहिस्ता एस. इनामदार, एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. शालिनी घुमरे, मा .महेंद्र विंचूरकर, मा.अनिल शेळके , प्रा. मकरंदपांडे, डॉ. समीर चव्हाण, सौ. मंगल पाटील (ग्रंथपाल), प्रा. वैष्णवी कोकणे, प्रा. मीनाक्षी जाधव, प्रा. उल्का चौहान, प्रा. वसुंधरा चौधरी, श्री. अतुल उंबरकर, श्री. हर्षल अनेराव, श्री. विश्वास शेळके, श्री. घनश्याम कांबळे, श्री. मच्छिंद्र रिकामे, श्री. सुरेश रिकामे, श्री. सुनील रिकामे, श्री. सदाशिव रिकामे, श्री.अनिल जाधव, श्री.फाकिराराव शिंदे, श्री. दत्तात्रय चौरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन अनघा सोनार यांनी व्यक्त केलं.

Day 2Date 03/02/2023

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व नवजीवन एज्युकेशन सोसायटी चे नवजीवन विधी महाविद्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवकांचा ध्यास, ग्रामशहर विकास या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराचा दुसरा दिवस ग्रामपंचायत, ग्रामसंस्कार केंद्र विचुरी गवळी ता. जि. नाशिक येथे संपन्न झाला.

आज सकाळच्या सत्रा मध्ये रा.से.यो. च्या स्वयंसेवकांनी योगा चे धडे गिरविले. त्यानंतर अल्पो पहार देण्यात आला. स्वयंसेवकांचे निवास स्थान ते ग्रामपंचायत कार्यालया पर्यंत पदयात्रा काढण्यात आली. त्यात विधसामाजिक जनजागृती करणाऱ्या घोषणांची आतषबाजी करण्यात आली. स्वयंसेवकांनी गावातील ग्रामपंचायत परिसर तथा विविध तीन ठिकाण च्या मंदिराच्या परिसरातील स्वच्छता केली. यानंतर दुपार चे जेवण आणि विश्रांती साठी सुट्टी देण्यात आली.

संध्याकाळच्या वैचारिक प्रबोधन यासत्रात डॉ. समीर चव्हाण सर ( नवजीवन विधी महाविद्यालय, नाशिक तथा सदस्य, विधी अभ्यास मंडळ, सा. फु. पु. वी. पुणे ) यांनी राष्ट्र उभारणीसाठी युवकांचा सहभाग या विषयावर सखोल मार्गदर्शन करून व्याख्यानमालेत दुसरे पुष्पगुंफले. बोलतांना ते म्हणाले, केवळ वयाचं तारुण्य असून चालत नाही तर प्रत्येक व्यक्तींनी मनाने आणि विचाराने चिरतरुण राहावे. हाच राष्ट्रउभारणी चा मुख्य पाया ठरणार आहे. यावेळी त्यांनी इतिहासातील विविध महापुरुष आणि महामानवां चे दाखले देऊन अगदी सोप्या भाषेत विद्यार्थ्यां समोर विषय ठेवला.आजचा युवक बेकरी, बेरोजगारी, तणाव, व्यसनाधीनता, व्यायामाचा अभाव, असामाजिकता आणि समाज माध्यमाच्या विळख्यात अडकले ला युवक इत्यादी समस्यांचा सामना करत असल्याचं मत व्यक्त केलं.

बदलत्या काळा नुसार समाजाच्या आणि पर्यायाने देशाच्या अपेक्षाही बदलत असतात. आज देशासाठी मरमिटण्याची वेळ नाही, तर स्वराज्याच सुराज्य करण्यासाठी छोट्याछोट्या दैनंदिन कृतीतून राष्ट्र उभारणीसाठी हातभार लावता येईल. २१ व्या शतकातील विद्यार्थी म्हणून 4-D ( Devotion, Descipline, Dedication & Determination ) आणि 5-C ( Competance, Confidence, Connection, Character & Caring ) चायोग्य वापर करून राष्ट्रउभारणीसाठी आपलं योगदान द्यावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या प्रसंगी महाविद्यालयाच्या डॉ. प्रज्ञा सावरकर मॅम विचार मंचावर उपस्थित होत्या. डॉ.प्रज्ञा सावरकर यांनी विविध विषयांवर अतिशय खेळी-मेळी च्या वातावरणात विद्यार्थ्यांशी हितगुज साधला.

यानंतर विद्यार्थ्यांना विश्रांती देण्यात आली. दरम्यान च्या काळात विद्यार्थ्यांनी पथनाट्याची तालीम घेतली. संपूर्ण दिवसभरात श्री. घनश्याम कांबळे आणि श्री. अरुण किरवेयांनी विद्यार्थ्यांना सहकार्य केलं. रात्रीच्या जेवणा नंतर शिबिराच्या दुसऱ्या दिवसाची सांगता झाली.

Day 3Date – 04/02/2023

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व नवजीवन एज्युकेशन सोसायटीचे नवजीवन विधीमहाविद्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने’ युवकांचा ध्यास, ग्रामशहर विकास’ या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराचा तिसरा दिवस ग्रामपंचायत, ग्रामसंस्कार केंद्र विंचुरीगवळी, ता. जि. नाशिक येथे डॉ. गोरक्षनाथ पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

वैचारिक प्रबोधन या सत्रात डॉ.गोरक्षनाथ पिंगळे, रा. से .यो. विभागीय समन्वयक, नाशिक यांनी रासेयो च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या विषयावर सखोल मार्गदर्शन करून व्याख्यान मालेतील तिसरे पुष्प गुंफले. या प्रसंगी विचार मंचावर प्रा. मकरंद पांडे, डॉ. शालिनी घुमरे, सौ. मंगल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय सेवा योजना फक्त योजना नसून ती महाविद्यालयीन युवकांसाठी उभी केलेली चळवळआहे.असे प्रतिपादन डॉ. गोरक्षनाथ पिंगळे यांनी यावेळी केले. ते म्हणाले, भारत हा खेड्यांचा समूह असलेला देश आहे. गावांत उद्भवणाऱ्या समस्या केंद्र सरकार, राज्यसरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध आस्थापणांच्या माध्यमातून सोडविण्यासाठी म. गांधींच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त २४ सप्टें. १९६९ रोजी सुरू झालेली रा.से.यो. ही केवळ ७ दिवसांच्या शिबिरा पुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन, सामाजिक जाणीव आणि जागृती निर्माण करून विविध क्षेत्रात नेतृत्वाची संधी उपलब्ध करून देत आहे.

विद्यार्थ्यांच्या जीवना मध्ये गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतचा प्रवास घडवून आणण्याचं काम रा.से.यो करीतआहे. यासाठी SRD, NRD, पंढरीचीवारी, राष्ट्रीय एकता शिबीर, राष्ट्रीय साहस शिबीर इत्यादी शिबिरांचे आयोजन दरवर्षी केले जाते. रा.से.यो चेहे शिबीर विद्यार्थ्यांना त्यांचा आतील आवाज ऐकायला भाग पाडून जीवनाचा प्रवास यशस्वीतेकडे नेण्यासाठी योग्य दिशादेण्याचे काम करीत आहेत.

नारि विना पुरुषाचं अस्तित्व शून्य आहे. त्यामुळे स्त्रियांचा यथोचित सन्मान करून महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन द्यावे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

याप्रसंगी श्री. घनश्याम कांबळे, श्री.अरुण किरवे तथा रा.से.यो. चे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमा चे सूत्रसंचालन प्रफुल मेश्राम, मान्यवरांचे परिचय प्रेरणा पराते तर आभार योगेश जोरवेकर यांनी मानले

Day 4Date-05/02/2023

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व नवजीवन एज्युकेशन सोसायटीचे नवजीवन विधीमहाविद्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवकांचा ध्यास, ग्रामशहर विकास या राष्ट्रीय सेवायोजना विशेष हिवाळी शिबिराचा चौथा दिवस ग्रामपंचायत, ग्रामसंस्कार केंद्र विंचुरीगवळी, ता. जि. नाशिक येथे डॉ. शाहिस्ता इनामदार व जिल्हा समन्वयक पुष्कर दीपक पाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे जिल्हा समन्वय पुष्कर दीपक पाडेकर यांनी नवजीवन महाविद्यालयाचे श्रम संस्कार शिबिर ठिकाण विंचूर गवळी येथे सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांना श्रमसंस्काराचे महत्त्व तसेच गावाचा इतिहास गावातील लोकांशी संपर्क कसा साधावा या बद्दल माहिती दिली. त्यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शाहिस्ता इनामदार कार्यक्रम अधिकारी सौ. शालिनी घुमरे व शिबिरातील सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.

वैचारिक प्रबोधन यासत्रात डॉ.शाहिस्ता इनामदार, प्राचार्या ,नवजीवन विधीमहाविद्यालय, नाशिक यांनी रासेयो च्या माध्यमातून महिला सक्षमीकरण या विषयावर सखोल मार्गदर्शन करून व्याख्यानमालेतील चौथे पुष्प गुंफले.

डॉ. शाहिस्ता इनामदार यांनी PPT Presentation द्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

स्त्रियांचा यथोचित सन्मान करून महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन द्यावे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांनी सहकार्याने दुपार चे जेवण बनवण्यात आले यासाठी प्राचार्या डॉ.शाहिस्ता इनामदार यांनी विद्यार्थ्यांना मदत केली.

त्यानंतर विद्यार्थ्यांना विश्रांती देण्यात आली.

त्यानंतर विद्यार्थ्यांची Rally काढून जनजागृती करण्यात आली.

रात्रीच्या जेवणा नंतर दिवसाची सांगता झाली.

याप्रसंगी श्री. घनश्याम कांबळे, श्री. अरुण किरवे तथा रा.से.यो. चे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाब करतुले व मान्यवरांचा परिचय प्रियंका शिंदे हिने करून दिला, तर आभार शिवाजी पाटील यांनी मानले.

Day 5Date- 06/02/2023

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, व नवजीवन एज्युकेशन सोसायटीचे नवजीवन विधीमहाविद्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांचा ध्यास, ग्रामशहर विकास याराष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराचा पाचवा दिवस.

सकाळ च्या सत्रात “विंचुरगवळी” या गावात विद्यार्थी जिथे राहतात तिथे सर्व विद्यार्थ्यांनी श्रमदान केले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांची पाचपाच प्रमाणे विभागणी करुन कामाचं वाटप करण्यात आलं. निवासीजागेचा संपूर्ण परिसर विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला.

दुपारच्या सत्रात २.३० वाजता प्रा. ऍड. बाबुलाल शिंदे सर यांनी “कायदे आणि गुन्हेगारी “या विषयावर विद्यार्थ्यांना विविध कलम आणि उदाहरणंया द्वारे मार्गदर्शन करुन व्याख्यान मालेचे पाचवे पुष्प गुंफले.

यावेळी बोलतांना प्रा. ऍड शिंदे सर यांनी “वकिली करतांना कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जाण्याची वेळ येते. सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची तयारी किंवा अभ्यास केला पाहिजे यावर मार्गदर्शन केले तसेच “सरकारी वकील “आणि “खाजगी वकील” यांमधील फरक विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं . तसेच त्यांचा आजवरच्या कामाचा अनुभव उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितला. विद्यार्थ्यांना कलम आणि कायदायांचा अभ्यास करताना वेगवेगळ्या उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन दिले. यावेळी व्यासपीठावर डॉ.शालिनी घुमरे मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाबकर टूले यांनी केलं. प्रेरणा चारोस्कर यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करुन दिला. आभार प्रदर्शन गौरव गाजरे यांनी केले.

सायंकाळच्या सत्रात ५ वाजता “विंचूरगवळी ग्रामपंचायत कार्यालया बाहेर” वृक्षारोपण करण्यात आले . विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत प्रांगणात नारळाची झाडे लावली. यावेळी विंचूर गवळी गावातील जेष्ठ महिला श्रीमती यमुनाबाई दत्तात्रय रिकामे , संजय गवळी , फकिरा शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Day 6Date – 07/02/2023

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, व नवजीवन एज्युकेशन सोसायटीचे नवजीवन विधीमहाविद्यालय, नाशिक यांच्या संयुक्तविद्यमाने “युवकांचा ध्यास, ग्रामशहर विकास या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराचा सहावा दिवस

“सकाळ चा प्रहर”. ग्रामपंचायत, ग्रामसंस्कार केंद्र ” विंचुरी गवळी” या गावच्या ग्रामपंचायती कार्यालया समोर विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले.

एनएसएस कॅम्पच्या सहायाने गावा मध्ये गावकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आले.” मानवता कॅन्सर सेंटर हेल्थ च्या C.S.R. इन्चार्ज मंजुषा पाटील ( HCG manavta cancer Curie Center ) त्यांच्या टीम सोबत उपस्थित होत्या, तसेच श्रीराम आयक्लिनिकचे P.R.O. हेमंत ईसे सर’ त्यांच्या टीम सोबत उपस्थित होते. विचार मंचावर “प्रोफेसर उल्का चौहान मॅडम आणि प्रोफेसर वसुंधरा चौधरी मॅडम तसेच गावातील ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते. “मानवता कॅन्सर सेंटर हेल्थच्या इन्चार्ज यांनी त्यांच्या व्याख्यान मालेतून कॅन्सर विषय विद्यार्थांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की पूर्ण भारतात कॅन्सरच्या मृत्यू चे प्रमाण ८० हजार आहे. तर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. लोकांना सरकार तर्फे रुग्णांसाठी वेगवेगळ्या योजना फ्रीआहेत, त्या योजनाचा लाभ प्रत्येक रुग्णाला कसा मिळतो त्यावर त्यांनी मार्गदर्शन केले. कॅन्सरचे खूप सारे प्रकार आहेत. उदा. जनेटिक कॅन्सर, लहान मुलांचे कॅन्सर , किडनीचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर,असे खूप प्रकार आहेत. 170 च्यावरती कॅन्सर असून हे कुठल्याही व्यक्तीला होऊ शकतो. ते होऊ नये म्हणून रोजच्या आहारात नसर्गिक आहाराची गरज आहे .कॅन्सर निदाना साठी C.B.C. test किंवा Bone marrow test केल्या जातात . वेळेत समस्या उद्भवल्यास नजदिक च्या हॉस्पिटल मध्ये chekup करून घेत जाअसे त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी ट्रीटमेंट चे काही प्रकार जसकी radiation, chemotherapy, immunotherapy यांची माहिती देखील त्यांनी सांगितली.

त्या नंतर श्रीराम आयक्लिनिक चे P.R.O. हेमंत ईसेयांनी डोळ्यांचे अजारा हे कशामुळे उद्भावतात यांची उदाहरणे देऊन विद्यार्थांना मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनात माणसांचा इंटरनेट, मोबइलद्वारे, अतिवापर असल्याकारणाने डोळ्यांना त्रास होतो. यावर विविध उपाययोजना सांगून त्यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.

त्यानंतर मोफत आरोग्य तपासणी शिबिर चालू झाले. एनएसएस कॅम्पचे representative “अनघा सोनार “आणि “अनुग्रह नारायण” यायांच्या मार्गदर्शना खाली एनएसएस कॅम्पचे स्वयंसेवक यांचे वेगवेगळे ग्रुप बनऊन विंचूर गवळी गावातील प्रत्येक घरात, मळ्यात जाऊन आरोग्य तपासणी शिबिर याची माहिती दिली . गावातील व मळ्यातील अनेक रुग्ण आरोग्य तपासणीसाठीआले. टीमने आरोग्य तपासणी केली. गावातील प्रत्येक रुग्णाचा B.P. , Sugar (BSL) सुध्दा तपासले. एनएसएस कॅम्प आणि मेडिकल कॅम्पचे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे “सूत्र संचालन व परिचय, गुलाब करटूले आणि आभार प्रदर्शन प्रो. वसुंधरा चौधरी मॅडम यांनी केले. त्यानंतर त्यांना तुळशीचे रोप देऊन त्यांना निरोप देण्यात आला.

संध्याकाळी मा. बडे मॅडम, मा.पवार मॅडम व मा.चव्हाण मॅडम यांनी camp ला भेट देऊन विद्यार्थ्यां सोबत संवाद साधला.

तसेच रात्री विद्यार्थ्यांनी शेकोटीचा आनंद लुटला.

Day 7- Valedictory Session of NSS Special Winter Camp.Date 08/02/2023

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व नवजीवन विधी महाविदयालय, नाशिक यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित “युवकांचा ध्यास, ग्रामशहर विकास”, या अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षाचे राष्ट्रीय सेवायोजना विशेष हिवाळी निवासी श्रमसंस्कार शिबीर दि.२/२/२०२३ ते दि. ८/२/२०२३ या कालावधी करिता विंचूरी गवळी, पो. माडसांगवी, ता. जि. नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते .या ८ दिवसांच्या श्रमसंस्कार शिबीरात विदयार्थ्यांद्वारे ग्राम स्वच्छता, वृक्षारोपण, जनजागृती यासारखे उपक्रम राबविण्यात आले. सदर शिबीराचा समारोप दि. ८/२/२०२३ रोजी झाला. यासमारोप कार्यक्रमा प्रसंगी नवजीवन एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन सौ बडे मॅडम अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. तर विंचुरी गवळी गावच्या सरपंच सो अनिता विजय रिकामे, उपसरपंच श्री विजय दत्तात्रय रिकामे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच गावातील ज्येष्ठ माजी सरपंच यमुनाताई दत्तात्रय रिकामे, सदाशिव रिकामे, शिवाजी रिकामे, दत्तात्रय वाघचौरे, विंचूरी गवळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रमाकांत शिंदे, फकिरराव शिंदे, उत्तम रिकामे, गंगाराम शेलार, स्वाती रिकामे व तसेच नवजीवन एज्युकेशन सोसायटीच्या मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्ह सौ पवार मॅडम, नवजीवन विधीमहाविदयालया च्या प्राचार्या डॉ शाहिस्ता इनामदार मॅडम, प्रोफसर मकरंद पांडे सर, डॉ प्रज्ञा सावरकर मॅडम, डॉ समीर चव्हाण सर, महेंद्र विंचूरकर सर, कोकणे मॅडम, शिबीर अधिकारी डॉ शालिनी घुमरे – पेखळे, विदयार्थी प्रतिनिधी अनुग्रह नारायण, अनघा सोनार व शिबीरातील सर्व विदयार्थी व विदयार्थीनी उपस्थित होते. सदर समारोप कार्यक्रमा प्रसंगी चेअरमन सौ बड़े मॅडम, सरपंच सौ अनिता रिकामे, प्राचार्या डॉ शाहिस्ता इनामदार मॅडम, प्रोफेसर मकरंद पांडे सर, महेंद्र विंचूरकर सर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रमाकांत शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन शिबीरातील विदयार्थ्यांना लाभले. तसेच शिबीरासाठी अनिल देशमुख, हर्शल आनेराव, घनश्याम कांबळे, अरुण किरवे यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबीर समारोप कार्यक्रमा चे सूत्रसंचालन विदयार्थी प्रतिनिधी अनघा सोनार हिने केले. तर आभार प्रदर्शन शिबीरअधिकारी डॉ शालिनी घुमरे-पेखळे मॅडम यांनी केले. तसेच समारोप कार्यक्रमा प्रसंगी विदयार्थ्यांकडून जनतेत मतदाना बाबत जनजागृती व्हावी या करिता पथनाटय देखील सादर करण्यात आले.